चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अडावद येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सोहळा पार पडला. शिवप्रेमी नागरिक, युवक, ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी सरपंच कुसुमताई मनोहर पाटील, चोसाका संचालक दिनकर देशमुख, अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांची उपस्थिती होती.
यासोबतच माजी उपसरपंच वजाहतअली काझी, सुनिल सारस्वत, विष्णुकांत दहाड, विकासो चेअरमन भुषण देशमुख, संचालक सचिन महाजन, प्रकाश महाजन, प्रभाकर महाजन तसेच ग्रामपंचायत सदस्य जुनेदखा पठाण, राजेंद्र देशमुख, संजय देशमुख, महेंद्र पाटील, जितेंद्रकुमार शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिवचरित्रावर आधारित व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या गाथेचा जागर गावभर घुमला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवजयंती उत्सव समिती आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.