मुंबई प्रतिनिधी । कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या साम्राज्याला हादरवून सोडणारे मुंबई महापालिकेचे निवृत्त अधिकारी उदयकुमार शिरुरकर विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. निवृत्त सहाय्यक आयुक्त शिरुरकर मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमिन पटेल यांना ते आव्हान देणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महापालिकेच्या बी विभाग कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले उदयकुमार शिरुरकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे दोन वेळ आमदार अमिन पटेल आणि महायुतीचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांना ते आव्हान देणार आहेत. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमिन पटेल दोन टर्म निवडून आलेले आहेत. हॅट्ट्रिक साधण्याचा पटेलांचा निर्धार आहे. परंतु उदयकुमार शिरुरकरही जिंकण्याच्या इर्षेने मैदानात उतरले आहेत.