जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, रिजवान सलीम पिंजारी (वय -35 रा.मलिक नगर, शिरसोली) हा जैन इरिगेशनच्या कंपनीमध्ये चालक म्हणून काम करतो. आज सकाळी कंपनीतून नाईट शिफ्ट करून नुकताच घरी आला होता. सकाळी जेवण झाल्यानंतर घरी आलेल्या गॅस सिलेंडर वाला यांच्याकडून सिलेंडर घेतले. त्याच वेळी त्याच्या छातीत अचानक छातीत दुखायला सुरुवात झाली आणि लागलीच जमिनीवर कोसळला. गॅसहंडी चालकाच्या गाडीने तातडीने त्याला तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी रीजावानला मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.