शिंदे इंटरनॅशनल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम

पाचोरा प्रतिनिधी । सीबीएससी बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहिर झाला असून पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.

शिंदे इंटरनॅशनल स्कूलमधील शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यात सर्व ४८ विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण झाले असुन शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. सदर मूल्यांकनात दिव्या संजीव चौधरी या  विद्यार्थीनीने ९५.४० टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. हर्षाली सुधीर देवरे  ९४.६० टक्के मिळवून व्दितीय तर प्रेम गणेश खडे या विद्यार्थ्याने ९३ टक्के मिळून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशासाठी संस्थेचे, गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे, सचिव अॅडव्होकेट जे. डी. काटकर, संस्थेचे सह – सचिव शिवाजी शिंदे, सदस्य नीरज मुनोत तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील आणि शिक्षक वृंद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

Protected Content