मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डोंबिवलीत ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. डोंबिवली येथील शिंदे गटाचे विश्वासू व दिग्गज नेते दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. या मतदारसंघात भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आहे.
दीपेश आता ठाकरे गटाकडून त्यांना आव्हान देऊ शकतात. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दीपेश म्हात्रे यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ज्यावेळी दीपेश मात्रे शिंदे गटात गेले त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीला भेटून आले आणि मगच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
दीपेश हे शिंदेच्या युवा सेनेचे सचिव आहे. दीपेश म्हात्रे आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेमधील चार माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यां घेवून ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. हा पक्ष प्रवेश मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे, अशी माहिती दीपेश यांनी दिली आहे.