Home Cities अमळनेर मंगळग्रह मंदिराच्या विकासासाठी शिखर समितीने दिली मंजुरी

मंगळग्रह मंदिराच्या विकासासाठी शिखर समितीने दिली मंजुरी

0
49

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी शिखर समितीने 25 कोटी रूपयाच्या आराखड्यास मान्यता दिली असून शेगाव मंदिराच्या धर्तीवर विकास करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर विकासाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

 

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. स्मिता वाघ,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार सरोज अहिरे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील एकमेव अशा मंगळ ग्रह मंदिराचा विकास शेगाव विकास आराखडा च्या पाश्वभूमीवर करावा व हे काम करण्यासाठी अनुभवी वास्तुविशारदची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या व या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी असे सूचित केले.या कामासाठी तात्काळ शासन निर्णय काढून इ-निविदा करण्याबाबत निर्देश दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी या शिखर समिती समोर मंगळगृह मंदिराच्या आराखड्याचे सादरीकरण ठेवले होते.


Protected Content

Play sound