बोडवड प्रतिनिधी | दिवाळी आधी हेक्टरी 35 ते 40 हजार रूपये मदत मिळावी, यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोदवड येथील तसीलदार प्रथमेश घोलप यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.
बोदवड येथे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष गुलाब अहमद मामू यांच्या आदेशाने बोदवड तालुका अध्यक्ष रामेश्वर लोहार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले आहे.
तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्वरित शेतकऱ्यांना 35 ते 40 हजार हेक्टरी अतिवृष्टीची मदत मिळेल यासाठी प्रयत्न व्हावे.
यासाठी आंदोलनात सहभागी झालेले भास्कर साळुंके, देविदास शेळके, समाधान पारधी, विश्वनाथ सुरंगे, पवन लोहार, सुरेश कोळी, संतोष चौधरी, जितेंद्र गायकवाड, शेखसाम उद्दीन उर्फ राजू मेकॅनिकल, राजु फकिरा, डॉ.अजय वैष्णव, अशोक तायडे, शरद सुरवाडे, कोल्हाडी कमिटी प्रमुख नीळकंठ ढाके, सखाराम निकम, सूर्यभान सूर्यवंशी, विलास बोदडे, गजानन वानखेडे, राजेंद्र बाविस्कर, भीमा पवार, महासेन सुरडकर, हरिदास पवार इंगळे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.