पहूर प्रतिनिधी । तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळ खासगी बस पलटी झाल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. सर्व जखमींना पाचोरा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
याबाबत माहिती अशी की, पाचोराहून पुण्याकडे जाण्यासाठी निघालेल्या साईराम ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक (एमएच 19 वाय 3303) शेंदुर्णीजवळ रविवारी रात्री जात असतांना माळी चौफुलीजवळ पलटी झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. यात तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. तर इतर पाचजण किरकोळ जखमी झाले होते. शेंदुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि राकेशसिंग परदेशी यांना तात्काळ माहिती मिळाले असता आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन सर्व जखमींना रुग्णालयात उपचारार्थ पाचोरा येथे दाखल केले. उर्वरित प्रवाशांना शेंदुर्णी जवळ सत्कार हॉटेल जवळ थांबून पुण्याकडे सुखरूप रवाना केले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मदत कार्य करून सर्व प्रवाशांना पोउनि अमोल दिवटे, पो.कॉ. प्रवीण देशमुख, ईश्वर देशमुख, अनिल अहिरे, नाना देशमुख यांनी प्रवाश्यांना सहाकार्य केले.