शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेंदुर्णी प्रतिनिधी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशात १५ दिवसाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील भारतीय जनता पक्षाचे वतीने आज २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती रोजी येथील ममता हॉस्पिटल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यासाठी ममता हॉस्पिटल शेंदुर्णी व गोळवलकर रक्तपेढी जळगांव यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठया प्रमाणावर सहभाग नोंदविण्याचे आवाहन शेंदुर्णी शहर भाजपाचे वतीने करण्यात आले आहे.