मोंदीच्या शपथविधीला शेख हसीना आल्या; गांधी कुटुंबियाचीदेखील घेतली भेट

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला १० जून रोजी आल्या होत्या. त्यांनी नवी दिल्लीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीवेळी येथे रायबरेली येथून निवडून आलेले खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या. या भेटीची माहीती कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स हॅंडलवरुन एक पोस्ट करून दिली आहे. या भेटीवेळी शेख हसीना यांनी सोनिया गांधी यांची गळा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांची देखील गळाभेट घेतली.

बांग्लादेश भारताचा मित्र देश आहे. या देशाशी भारताचा व्यापारी संबंध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या मित्र देशांच्या यादीत या आपल्या शेजारी देशाचे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे मोदी यांच्या शपथविधी समारंभाचे आवर्जून आमंत्रण शेख हसीना यांना देण्यात आले होते. शेख हसीना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला शनिवारी दिल्लीत पोहचल्या. त्यानंतर रविवारी सायंकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रंगलेल्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात सहभाग घेतला. या सोहळ्याला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्जू, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि श्रीलंकचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या सह शेजारील देश आणि हिंद महासागर क्षेत्रातील प्रमुख नेते मंडळींनी सहभाग घेतला.

Protected Content