Home धर्म-समाज पाचोरा येथील शीतल पाटील ‘महिला आयकॉन – २०२२’ पुरस्काराने सन्मानित

पाचोरा येथील शीतल पाटील ‘महिला आयकॉन – २०२२’ पुरस्काराने सन्मानित

0
36

पाचोरा – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील शीतल आर्ट क्लासेसच्या संचालिका शीतल निशिकांत पाटील यांना महिला आयकॉन २०२२’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, ‘पाचोरा येथील शीतल आर्ट क्लासेसच्या संचालिका शीतल निशिकांत पाटील यांनी पोर्ट्रेट रांगोळी आणि सर्जनशीलतेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्रातील महिला आयकॉन पुरस्कार – २०२२ प्रदान करण्यात आला.

शीतल पाटील यांनी कला क्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना सर्वोकृष्ट महिला पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्यांची ८ व्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘वुमन आयकॉन अवॉर्ड – २०२२’ या वुमन आयकॉन शीर्षकाने महिला जागतिक रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound