Home राजकीय शत्रुघ्न सिन्हा यांचा लवकरच काँग्रेस प्रवेश !

शत्रुघ्न सिन्हा यांचा लवकरच काँग्रेस प्रवेश !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली असून ६ एप्रिलला त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची औपचारिक घोषणा होणार आहे. दरम्यान,‘मोहब्बत करनेनाले कम न होंगे, शायद तेरी महफिल में लेकिन हम न होंगे’ असे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले होते. हा शेर ट्विट केल्यानंतर तर शत्रुघ्न सिन्हा भाजपा सोडणार हे निश्चितच मानले जात होते.

भाजपाने पटना साहिब या ठिकाणाहून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ते नाराज होतेच शिवाय याआधीही गेल्या काही महिन्यांपासून ते विरोधकांसोबतच दिसत होते. त्यामुळे ते भाजपा सोडणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. ते आता निश्चित झाले आहे. केंद्रीय मंत्री असलेले रविशंकर प्रसाद यांना पटना साहिब येथून तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस कडून शत्रुघ्न सिन्हा आणि भाजपाकडून रविशंकर प्रसाद अशी लढत या ठिकाणी होऊ शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound