Home राजकीय शत्रुघ्न सिन्हा यांची काँग्रेस प्रवेशाची शक्यता

शत्रुघ्न सिन्हा यांची काँग्रेस प्रवेशाची शक्यता


shatrughan sinha 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाने बिहारमधील ४० पैकी ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अपेक्षेप्रमाणे केंद्र सरकारवर सतत टीकेची झोड उठवणारे भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापल्यामुळे ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाटणा साहिब या जागेवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तिकिट कापल्यानंतर दुखावलेले शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवारी भाजपची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच सिन्हा आपल्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा करतील असे बोलले जात होते. सिन्हा २४ किंवा २५ मार्चला काँग्रेसप्रवेशाची घोषणा करतील असे सिन्हा यांच्या सहकाऱ्याने माहिती देताना सांगितले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound