Home Cities पारोळा  शर्व पाटीलचा राज्य आदर्श शिक्षक भावसार यांच्याहस्ते गौरव

 शर्व पाटीलचा राज्य आदर्श शिक्षक भावसार यांच्याहस्ते गौरव


पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील युवा विद्यार्थी शर्व अभय पाटील याने शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे यश मिळवले असून, नुकतीच त्याने एम टेक इन कॅम्प्युटर सायन्स ही पदवी संपादन केली आहे. शर्वने ही पदवी तामिळनाडूतील प्रसिद्ध व्ही. आय. टी. युनिव्हर्सिटीमधून प्राप्त केली असून, गुणवत्तेमुळे त्याला अंतिम सेमिस्टरपूर्वीच कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे शर्व पाटीलचे समाजातून विविध स्तरांवरून अभिनंदन होत आहे.

शर्व पाटील हा दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार अभय पाटील यांचा सुपुत्र आहे. शिक्षणातील त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीची आणि यशाची दखल घेत, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षक स. ध. भावसार यांनी शर्व याच्या घरी जाऊन त्याचा विशेष सत्कार केला. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात शर्वच्या आई-वडिलांचीही उपस्थिती होती. भावसार सरांनी शर्वच्या मेहनतीचे आणि मूल्याधारित शिक्षणाच्या प्रवासाचे कौतुक करत, त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शर्व पाटीलच्या यशामुळे पारोळा शहरासह परिसरातील युवकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या या शैक्षणिक प्रगतीवर आ. अमोल पाटील आणि माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनीही खास अभिनंदन करत त्याचे कौतुक केले आहे. शर्वने शैक्षणिक उंचीवर पोहोचत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

शर्व पाटील याने आपल्या चिकाटी, अभ्यास आणि दूरदृष्टीच्या जोरावर शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवत, पारोळा शहराचे नाव उज्वल केले असून, राज्य आदर्श शिक्षकांनी त्याचा सत्कार करून त्याला अधिक प्रोत्साहन दिले आहे.


Protected Content

Play sound