पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या टिकेला शरद पवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर घणाघाती टिका केली होती. त्यांना ३८व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला होता तर मी साठाव्या वर्षात का घेऊ नये ? असे सांगत त्यांनी टिकास्त्र सोडले होते. तसेच बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सूतोवाच देखील त्यांनी केले होते.
अजितदादांच्या आरोपांना आज शरद पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, मागील दहा- पंधरा वर्ष बारामती व परिसरातील स्थानिक कामे, निवडणूका यामध्ये माझे लक्ष नव्हते. याचा अर्थ मी कोणाला तरी काम करण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक दिली होती. देशात आणि राज्यात नेहमी नवीन लोकांना संधी देण्याचा मी प्रयत्न केला. याप्रसंगी त्यांनी १९७८ सालच्या राजकीय नाट्याव भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारचे बंड केले नव्हते. सर्वांनी बसून निर्णय घेतला होता. आता जरी कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर त्याबाबत तक्रारीचं कारण नाही, असे म्हणत पक्षाची निर्मीती कशी झाली? संस्थापक कोण आहे?हे जगजाहीर आहे, त्यामुळे यावर जास्त बोलण्याची गरज नाही… असा टोलाही त्यांनी लगावला.