पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर प्रकरणा विरोधात महाविकास आघाडीने राज्यभरात मुक आंदोलन केले. यावेळी पुण्यात शरद पवारही या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांच्या बरोबर सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही होते. आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. त्यावेळी शरद पवारांनी भिजत आंदोलन सुरूच ठेवले. त्यांच्या बरोबर खासदार सुप्रिया सुळे, आमदार रविंद्र धंगेकर हे ही भित आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलना दरम्यान शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. एक अस्वस्थ करणारा हा प्रसंग आहे. बदलापूरला जो चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला, त्याने सबंध देशात राज्याची नाचक्की झाली.राज्याच्या नावलौकीकाला धक्का बसला असे शरद पवार यावेळी म्हणाले. ज्या सरकारची या गोष्टी रोखणे ही जाबाबदारी आहे त्यांना त्याची जाण राहीली नाही. या घटनेनंतरही कुठेना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. शरद पवार यांच्या प्रमाणे सुप्रिया सुळे यांनीही भिजत आंदोलनात सहभाग नोंदवला. गेल्या पंधरा दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. पोलीसांनी वेळेवर नोंद घेतली नाही. वर्दीची भिती कोणालाही राहीले नाही, असा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला. हे सरकार असंवेदनशील आहे. असे ही त्या म्हणाल्या. बदलापूरमध्ये आंदोलन करणारे स्थानिक होते. ते लेकीसाठी लढत होते. त्याला सरकारचे प्रमुख बाहेरून आलेले लोक असे म्हणत होते.