नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे बडे नेते उपस्थित असून राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्याचा अंतिम निर्णय या बैठकीत होणार आहे.
या बैठकीला राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नवाब मलिक तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, जयराम रमेश, सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान असे एकूण 15 जणांनी चर्चा केली. सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास मान्यता दिल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याचा अंतिम फैसला घेण्यात येणार असून नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही ठरविण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संध्याकाळी पाचवाजता या बैठकीला सुरुवात झाली होती.