मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई व महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचा निर्णय घेतला आहे, असे खुद्द पवार यांनी थोड्यावेळा पूर्वी स्पष्ट केले.
तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ईमेल ईडीकडून शरद पवार यांना पाठवण्यात आला होता. तसेच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला असल्याची माहिती दिली. तसेच यानंतर आपण पुण्यात पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.