मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहे. अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अशातच शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या आणि दिवंगत आमदार विनायक मेटे ज्योती मेटे यांनी आज शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे.
त्यांना पक्षाकडून बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणूक देखील लढण्याची इच्छा होती. त्यासंदर्भात त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चाही केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.
गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलने झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सांगड घालण्यात येते असल्याचे बोलले जात आहे.