लोकसभा निकालाआधी शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय; ‘या’ नेत्याला बनवले राष्ट्रीय कार्याध्यक्ष

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असताना सर्वांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी विश्वासू नेत्याची निवड केली आहे.

पी.सी. चाको यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून संधी देण्यात आलीय तर पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी राजीव झा यांना संधी देण्यात आली आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी पक्षात बदल केले आहेत. पीसी चाको यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रीय महासचिव पदी राजीव झा यांना संधी देण्यात आली आहे.

Protected Content