
फैजपूर (प्रतिनिधी) दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यात विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सोमवारी जळगाव येथे काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात रावेर विधानसभा मतदारसंघातून मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी गृहराज्यमंत्री जेटी महाजन यांचे चिरंजीव शरद महाजन यांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी, अशी मागणी करून मुलाखत दिलेली आहे.
शरद महाजन हे एक प्रेमळ व संयमी स्वभाव असलेले व्यक्ती म्हणून परिसरात परिचित आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शरद महाजन हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. 2005 मध्ये न्हावी गावातून सरपंच पदावर त्यांची वर्णी लागल्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांना 2008 मध्ये जिल्हा परिषद कडून काँग्रेस पक्षातर्फे न्हावी- बामणोद गटातून मोठ्या मताधिक्याने विजय झाले. पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर 2012 मध्ये पुन्हा त्यांच्या पत्नी आरती महाजन या काँग्रेसकडून दणदणीत विजय संपादन करून आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले.
2017 मध्ये प्रभाकर सोनावणे यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा शरद महाजन यांचा होता. एकंदरीत बघता शरद महाजन यांनी रावेर मतदारसंघातून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी दिली. आणि त्यातच अवघ्या पाच हजाराच्या मतांनी शिरीष चौधरी यांचा पराभव झाला. त्यामुळे यावेळी पुन्हा शरद महाजन यांनी काँग्रेस पक्षाकडून रावेर विधानसभा मतदार संघासाठी आपली उमेदवारीची मागणी केली आहे. त्यातच काल जळगाव येथे झालेल्या मुलाखतीत त्यांनी सुद्धा मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी पक्षासमोर आपली राजकीय पार्श्वभूमी व पक्षासाठी दिलेले योगदान हे पक्षश्रेष्ठींसमोर मांडले. त्यातच त्यांचे समर्थक यांनी देखील शरद महाजन यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. यातच शरद महाजन यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल, त्या निर्णयाचे मी तंतोतंत पालन करेल. पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल. असेही सांगितले. रावेर मतदार संघातून काँग्रेसतर्फे माजी आ. शिरीष मधुकरराव चौधरी व शरद महाजन हे दोघं उमेदवार ईच्छुक आहेत.