Home Cities यावल ठाकरे गटाच्या यावल तालुका प्रमुखपदी शरद कोळी

ठाकरे गटाच्या यावल तालुका प्रमुखपदी शरद कोळी

0
261

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, यावल तालुक्याच्या शिवसेना प्रमुखपदी शरद कोळी यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे उपनेते व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. शरद कोळी हे एक निष्ठावान आणि कणखर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

या निवडीनंतर यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांच्यासह गोपाल चौधरी, संतोष धोबी, योगेश चौधरी, विजय कुंभार, पिंटू कुंभार, सुरेश कुंभार, प्रवीण लोणारी, अझहर खाटीक, बी. एम. पाटील, आर. के. चौधरी, सूरज कोळी, प्रदीप वानखेडे, निवृत्ती खांबायत, नितीन कोळी, संदीप माळी, सुभाष वाघ, प्रकाश वाघ, रवी सपकाळे, योगेश राजपूत पाटील, विजय कवडीवाले, भरत कोळी, निलेश पाराशर अशा अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद कोळी यांचे अभिनंदन करून त्यांना भगव्या शुभेच्छा दिल्या.

या निवडीमुळे यावल तालुक्यात पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शरद कोळी यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारताना सांगितले की, “आम्ही यावल तालुक्यात पक्ष अधिक बळकट करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही सर्वत्र लक्ष केंद्रित करू.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात यावल तालुक्यात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ताकद वाढलेली दिसेल अशी अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound