
जळगाव (प्रतिनिधी) :जळगाव जिल्हा राष्ट्रीय कांग्रेसच्या वतीने आज दि.१४ रोजी जिल्हा काँग्रेस भवनाच्या प्रांगणात भारताचे माजी गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील,माजी आमदार शिरीषदादा चौधरी,डॉ राधेश्याम चौधरी, सलीम पटेल आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील,माजी आमदार शिरीष चौधरी,यांनी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. स्व. चव्हाण यांचे हे जयंती वर्ष जन्मशताब्दी वर्ष असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार आज वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी माजी शहराध्यक्ष सलीम पटेल, अमजद पठाण,जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, जमिल शेख,सुभाष पाटील, मनोज चौधरी, पी. जी.पाटील , अमजत पठाण, जगदीश गाढे, सागर सपके, जाकीर बागवान, डाॅ. शाहीद पटेल, प्रा. भारंबे,योगेश देशमुख आदी उपस्थित होते.


