शाम दीक्षित खून : म्हणे…हाफ पेक्षा फुल्ल मर्डरच बरा ; आरोपींची धक्कादायक कबुली

MIDC Photo

जळगाव प्रतिनिधी । मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित यांच्या मारेकऱ्यांना पहूर येथून आज दुपारी पोलिसांनी अटक केली. चौकशीत दोघं आरोपींनी पैशाच्या वादातून खून केल्याचे सांगीतले. जखमी केल्यानंतर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल होण्यापेक्षा थेट खून करून ३०२ चे आरोपी झालो. तर किमान आपला वट वाढेल. म्हणून जखमी शाम दीक्षित यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक कबुली दोघां आरोपींनी दिली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी गतीने तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत गुन्हाचा गुन्हा उघडकीस आणला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार काल रात्री हॉटेल रिगल पॅलेस, भजे गल्ली, जळगाव येथे मयत घनशाम शांताराम दिक्षीत व सुधीर महाले हे दोघं जण बसलेले होते. त्याचवेळी बाजूच्या टेबलावर मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा- सब जेलमागे,जळगाव) हा त्याच्या दोन मित्रांसोबत दारु पीत होता. तू माझ्या टेबलावर ये, यावरून यावेळी घनशामसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी मुन्नासोबत सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा- रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा देखील होता. त्यामुळे हा खून दोघांनी केला असल्याचा पोलिसांना सुरुवाती पासून संशय होता.

 

डिस्कव्हर दुचाकीने पहुरकडे पळाले

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर आरोपींच्या पथकं रवाना करण्यात आली होती. तत्पूर्वी या संदर्भात बाबतीत मयत घनशाम याचा भाऊ गणेश शांताराम दिक्षीत यांचे फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोस्टेचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना सदर आरोपी हे बजाज डिस्कव्हर वाहनाने पहुर पाळधीकडे गेले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पो.नि. रणजीत शिरसाठ व त्यांचेसोबत सहा.फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, मनोज सुरवाडे, हेमंत कळसकर, किशोर पाटील, निलेश पाटील, प्रविण मांडोळे, गोविंदा पाटील, सचिन पाटील अशांचे पथक रवाना झाले होते. या दरम्यान जळगाव-औरंगाबाद रोडवर भवानी फाटा, पहुर पाळधी या गावाजवळ पोलीस पथकाला बजाज डिस्कव्हर मोटर सायकल रोडवर लावलेली दिसली. तसेच दोन इसम शेतामध्ये लांब उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघां आरोपींना लागलीच ओळखले.

 

शेत जंगलात तीन किलोमीटर पाठलाग

 

पोलीस येत असल्याचे बघताच सनी आणि मुन्नाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी शेत जंगलामध्ये दोन ते तीन किलोमिटर अंतर पाठलाग करुन त्यांना शिताफीने विजय पाटील, मनोज सुरवाडे व किशोर पाटील यांनी पकडले. त्यांची विचारपुस केल्यानंतर दोघांनी खुनाची कबुली दिली. सनी आणि मुन्नाने पोलिसांनी सांगितले की, हॉटेल रिगलमध्ये लायटिंगचे १० हजार उधारी वरून शाम आणि माझ्यात वाद झाला. त्यामुळे तिथून मी निघून गेलो. घराजवळ आल्यावर त्याला सनी उर्फ चाळीस हा मला भेटला. त्याला मी सगळी हकीगत सांगीतली. त्यानंतर रात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास शामला आम्ही घराजवळ गाठले. यावेळी पुन्हा आमच्यात पुन्हा वाद झाला. वादात शामने मुन्नाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर आम्ही त्याला खाली ढकलेले. यात त्याच्या डोक्याला मार लागून रक्त निघायला लागले. त्यामुळे आता आपल्यालावर ३०७ दाखल होईल याची जाणीव होती. ३०७ पेक्षा ३०२ दाखल झाला तर किमान वट वाढेल. म्हणून दोघांनी शाम दीक्षित यांच्या डोक्यात क्रूरपणे दगड घालून ठार केले. दरम्यान, सनी उर्फ चाळास बसत पाटील याचेवर यापूर्वी देखील खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राजकुमार ससाणे, राजेंद्र कांडेलकर, सचिन मुंढे, दिपक चौधरी हे करीत आहेत.

 

कोणताही सुगावा नसतांना सहा तासात गुन्हा उघडकीस

 

सदरचा गुन्हा हा घडल्यानंतर आरोपीतांनी गुन्हा केल्याचा कुठल्याही प्रकारे सुगाय ठेवला नसतांना देखील कौशल्यपूर्णपणे काम करुन सहा तासाच्या सदरचा गुन्हा एमआयडीसी पोलीसांनी उपडकीस आणल्यामुळे पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी एमआयडीसी पोलीसांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, दुपारी अटक केल्यापासून शाम दीक्षित सोबत १० हजार रुपयावरून वाद असल्याचे मुन्ना आणि सनी सांगतोय. परंतू १० हजार सारखी किरकोळ रकमेसाठी खून होईल असे पोलिसांना वाटत नाहीय. आरोपी खुनाचे खरे कारण लपवित असल्याचा त्यांना संशय आहे. मात्र, संशयितांची पार्श्वभूमी आणि घटनाक्रम बघता पोलिसांना अजूनही वेगळा संशय असून त्या दिशेने पोलिसांची चौकशी करत असल्याचे कळते.

Protected Content