जळगाव प्रतिनिधी । शहरातील कासमवाडी परिसरातील कब्रस्थानजवळ शाम दीक्षित या तरुणाच्या खून प्रकरणी मुन्ना नामक तरुणाच्या पोलीस मागावर आहेत. याच तरुणाचा शाम दीक्षितसोबत रात्री वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील कासमवाडी परिसरातील कब्रस्थानच्या पुढे आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले होते. याप्रसंगी पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये हा मृतदेह शाम दीक्षित (वय ३२) या तरूणाचा असल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलीस तपासात शाम दीक्षितसह याने चार जणांसह शहरातील बस स्थानक लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये पहाटेवाजेपर्यंत मद्य प्राशन केले होते. यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री सोबत मद्यपान करणाऱ्या दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीतून मुन्ना नामक तरुणाचे नाव समोर आले असून हा तरून गणेश वाडीत राहत असल्याचे कळते. रात्री ज्यांनी वाद बघितला त्यांच्या नुसार मुन्ना आणि शाम या दोघांमध्ये बराचवेळ वाद सुरु होता. अगदी हॉटेलमधून बाहेर पडल्यावर देखील वाद सुरूच होता.
सकाळी पोलिसांनी मुन्नाचा घरी शोध घेतला असता, तो आढळून आला नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला आहे. पोलिसांनी रात्री मुन्ना घरी आला होता? त्याच्यासोबत कुणी होते का? आदी माहिती विचारण्यासाठी मुन्नाच्या भावाला चौकशीसाठी पोलीस स्थानकात नेले आहे. दरम्यान, दगडाने ठेचून त्याची क्रूर हत्या करण्यात आल्यामुळे दोघांमध्ये टोकाचा वाद झाल्याचा संशय पोलिसांना आहे. तर मुन्नाच्या शोधार्थ पथकं लवकरच रवाना होणार आहेत.