यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी मुरलीधर चौधरी हे मुंबई येथील झालेल्या दहशदवादी हल्यात वीरमरण पावल्याने त्यांचे स्मारक बांधणीला सुरुवात झाली आहे. बांधकामाची पाहणी करण्यासाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी भेट देऊन कामाच्या प्रगतीबद्दल विचार केली आहे.
हरिभाऊ जावळे यांनी केलेल्या प्रयत्नातून यावल सार्वजनिक विभाग क्र. २,५१५ (ग्रा.वि.) योजने अंतर्गत मंजूर झालेल्या कामाची, (सन २०१८-१९, अदांजीत रक्कम ३ लक्ष रु. इतकी मंजूर करण्यात आली आहे. संपुर्ण देशाला हादरून सोडलेल्या या मुंबई येथील शिवाजी महाराज टार्मिनल रेल्वे स्थानक व विविध ठिकाणी झालेल्या दहशद वादयांच्या भ्याड हल्ल्यात खानदेशच्या मातीतला विरमरण पावलेल्या शहीद मुरलिधर चौधरी हे मुळ हिंगोणा तालुका येथील रहिवासी होते. शहीद चौधरी यांच्या भव्य स्मारक बांधणीसाठी रावेर विधानसभेचे आमदार हरिभाउ जावळे यांनी स्वताः लक्ष दिल्याने तात्काळ या स्मारकाच्या काम सुरू करण्यात आले आहे. गावाच्या शहीद जवानांच्या स्मारकाचे काम सुरू झाल्याने हिंगोणा परिसरातील ग्रामस्थांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. या शहीद स्मारकच्या कामाची पाहणी करण्यासाठी आ. जावळे यांच्या सोबत जिल्हा परिषदच्या सदस्या सविता भालेराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक हिरालाल चौधरी, भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष डॉ. नरेद्र कोल्हे, भाजपाचे उजैनसिंग राजपुत, शशिकांत चौधरी, हिंगोणा ग्रामपंचायत छबु खुदाबक्ष तडवी, बाळु कुरकुरे, साहेबराव केदारे, भाजपाचे युवा कार्यकर्ते अतुल भालेराव, यांच्यासह मोठया संख्येने परिसराती ग्रामस्थ उपस्थितीत होते.