तपासणीसाठी आलेल्या महिलेवर दवाखान्यातच लैंगिक अत्याचार; एकाला अटक

ठाणे (वृत्तसंस्था) उल्हासनगरमधील एका दवाखान्यात सिटी स्कॅनसाठी आलेल्या महिलेवर टेक्निशियने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. जिन्स थॉमस असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे.

 

तक्रारदार 35 वर्षीय महिला उल्हासनगरातील एका हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी आली होती. त्यावेळी सिटीस्कॅन करणारा जिन्स थॉमस याने पीडित महिलेशी लगट करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने हिललाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी थॉमसविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Protected Content