मूकबधिर विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण ; शिक्षिकेला पाच वर्षांची शिक्षा

 

11

अकोला (वृत्तसंस्था) मलकापूर परिसरातील शासकीय मूकबधिर विद्यालयातील मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत अश्लील वर्तन करणे. तसेच त्यांच्याकडून पाय चेपणे व मालिश करून घेत लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 

मलकापूर परिसरातील शासकीय मूकबधिर विद्यालयात शीतल अवचार कार्यरत होती. मूकबधिर विद्यार्थ्यांकडून ती पायांची मालिश करून घेत होती. नंतर ती आरामात शाळेतच झोपायची. याबद्दल पालकांनी सुरुवातीला मुलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र नंतर एका पालकाने मुलाजवळ मोबाइल दिला. त्यानुसार एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने हातपाय चेपून घेत असतानाचा व शिक्षिका झोपल्याचा व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण म्हणजेच पोस्को कायद्यान्वये १३ ऑक्टोबर २०१३ रोजी गुन्हा दाखल करून नंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने शिक्षिकेस दोषी ठरवत पाच वर्षांचा कारावास आणि ३० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

Protected Content