छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. छ.संभाजीनगरमध्ये राहत्या घरात लिंग निदान करणाऱ्या महिलेलेवर कारवाई करण्यात आली. तीच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आले. तिरुपती नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती.
आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता इंजिनिअरिंग करणारी एक तरुणीकडून हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी १२ लाख ७८ हजारांची कॅश देखील मिळून आली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
छ.संभाजीनगरात १९ वर्षीय तरूणींकडून गर्भलिंग निदान रॅकेट
6 months ago
No Comments