रावेर प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून उद्या सोमवारपासून तालुक्यातील कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात येणार आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी फळ व भाजीपाला विक्रेत्यांना नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त आढळल्यास कडक दंडात्मक कारवाई येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी दिला आहे.
सोमवार १७ मे पासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, बीडीओ दीपाली कोतवाल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन, डॉ. शिवराय पाटील, निंभोरा येथील सपोनि स्वप्नील उनवणे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिक कडक प्रभावी वउपाययोजना करण्यात येणार आहेत शहरातील एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागात पालिकेतर्फे यापूर्वीच १५ ठिकाणी जागा निश्चित करून दिल्या आहेत. मात्र हे व्यावसायिक तेथे न बसता डॉ.आंबेडकर चौकात गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विक्रेत्यांविरुद्ध सोमवारपासून पालिका प्रशासन व पोलिस विभागाची संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे . कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते , व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासह गुन्हा दाखल करण्यात येईल , असा इशारा मुख्याधिकारी लांडे यांनी दिला .