सेट परिक्षेचा निकाल जाहीर

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ७ हजार २७३ उमेदवार पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्यांची टक्केवारी ६.६६ आहे.

विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. त्यानुसार ३९वी सेट परीक्षा ७ एप्रिल रोजी १७ शहरांमधील केंद्रांवर घेण्यात आली. एकूण एक लाख ९ हजार २५० उमेदवारांनी ही परीक्षा दिली. मात्र या परीक्षेला एसईबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आल्याने त्याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.

विद्यापीठाच्या https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

Protected Content