जळगाव प्रतिनिधी । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित राज्यस्तरीय पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षेचे आयोजन आठ केंद्रांवर करण्यात आले आहे.
आज सकाळी आठ केंद्रांवर सेट परीक्षा सुरू झाली आहे. यात केसीई सोसायटीच्या मु.जे. महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, आयएमआर, अभियांत्रीकी महाविद्यालय, बाहेती महाविद्यालय, लुंकड कन्या शाळा व ओरियॉन शाळा या केंद्रांचा समावेश आहे. या परिक्षेसाठी ३३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.