नवी दिल्ली । गलवान खोर्यातील संघर्षानंतर भारत-चीन संघर्षानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले असून सध्याची परिस्थिती १९६२ पेक्षा गंभीर असल्याची कबुली परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी केले आहे. पुस्तक प्रकाशनादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.
गलवान खोर्यात झालेला भारत-चीन संघर्षानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. सध्याची परिस्थिती १९३२ पेक्षा गंभीर असल्याचे वक्तव्य परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी केले आहे. पुस्तक प्रकाशनादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते. याप्रसंगी ते पुढे म्हणाले कि, १९६२ च्या युद्धानंतर लडाखमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील ४५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपले सैनिक शहीद झाले आहेत. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनाती केली आहे.
चीनसोबत आपली लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. पण, चीनने एकतर्फी कुठलाही बदल न करता सर्व करार आणि सहमतीचा आदर केला तर सीमावादावर तोडगा निघू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे. चीनबरोबर सीमेवर निर्माण झालेला तणाव संपुष्टात येण्यासाठी शांततामय मार्गाने तोडगा काढण्यावर भारत सरकारचा भर आहे. मात्र, चीनबरोबरची चर्चा निष्फळ ठरल्यास लष्करी पर्यायाचा विचार करण्याची भारताची तयारी असल्याची भूमिका संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांनी घेतली आहे.