भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव मधील कोळगाव ते भडगाव रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मधून गतिरोधक च्या ठिकाणी वळणावर ज्या ठिकाणी ट्रॅक्टर मधून वाडू खाली सांडली जाते. त्यामुळे गाडी स्लीप होऊन रोजचे एक्सीडेंट होत आहे तरी प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे जनता त्रस्त होती. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी व रमेश शिरसाठ व कार्यकर्त्यांनी दखल घेऊन स्वतः तगारी पावडी व खट्टा घेऊन कोळगाव ते भडगाव रोडावरील झाडून स्वच्छ केली. या संदर्भात प्रशासनाने वाळु चोरी करणाऱ्या वर कठोर कारवाई करावी यासाठी निवेदन नायब तहसीलदार रमेश देवकर यांना देण्यात आले.
आम्ही शासनात असलो तरी जनतेच्या न्यायासाठी आम्ही नेहमीच रस्त्यांवर उतरुन जनतेला न्यायमिळऊन देऊ यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच कटिबंध आहे. असे प्रतिपादन अनिल पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट, वि.का.सो.चेअरमन ग्रामपंचायत सदस्य शिंदी यांनी केले. या वेळी रवींद्र महाजन, रमेश शिरसाठ, आकाश कंखरे, महेश बाग, विक्रम सोनवणे संदिप पाटील, रविंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते..