खळबळजनक : भाजपा नेत्याच्या घरी सापडले 17 देशी बॉम्ब, 116 जिवंत काडतुसे

mp police

 

भोपाळ (वृत्तसेवा) मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. पोलिसांना यादव यांच्या घरातून घरातून 13 पिस्तुल, 17 देशी बॉम्ब आणि 116 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मध्य प्रदेश पोलिसांकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.

 

सोमवारी पोलीस अधिक्षक यांगचेन डी भूटिया यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये संजय यादव यांच्या घरातून 13 पिस्तुल, 17 देशी बॉम्ब आणि 116 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी संजय यादव यांच्यासोबत त्याचा सहकारी गोपाळ जोशी या दोघांवर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सेंधवा शहरात संजय यादव आणि गोपाळ जोशी यांच्या दोन टोळ्या सक्रीय आहेत. त्यांच्याविरोधात खंडणी, मारहाण, हत्या, धमकावणे यासारखे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. संजय यादवच्या विरोधात 47 गुन्हे तर गोपाळ जोशीवर 30 गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गॅंग एक मोठे षडयंत्र आखत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यात अजूनही अनेक नावे समोर येतील,असा अंदाज व्यक्त केला आहे.

Add Comment

Protected Content