जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आयएमआर महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार केल्याची तक्रार बुधवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता पोलीसात देण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरात आयएमआर महाविद्यालयाच्या परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनी शिक्षणासाठी वास्तव्याला आहे. पिडीत विद्यार्थींनी आणि १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी हे एका खाजगी क्लासेसमध्ये जेईई परिक्षेची तयारी करण्यासाठी क्लास लावलेला होता. जुलै २०२२ पासून ते मार्च २०२३ पावेतो या कालावधीत विधीसंघर्ष ग्रस्त बालकाने पिडीत विद्यार्थिनीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत पिडीतेसोबत वारंवार शरीरीक संबंध केले. दरम्यान, हा प्रकार पिडीत विद्यार्थींनीला सहन न झाल्याने तिने थेट जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अल्पवयीन विद्यार्थींवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि मिरा देशमुख ह्या करीत आहेत.