जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका शेत शिवारात झोपडीच्या मागील शेतात मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, मध्यप्रदेशातील खरगोन येथील रहिवाशी असलेलेली पिडीत १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबासह जामनेर तालुक्यातील ढालगाव शिवारातील शेतात वास्तव्याला आहे. दोन महिन्यापुर्वी पिडीत मुलगी शेतातील झोपडीत कुटुंबासह झोपलेले असतांना संशयित आरोपी अजय काशीराम सोळंखी रा. झिरण्या जि.खरगोन याने मध्यरात्री ३ वाजता पिडीत मुलीला उचलून तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर याबाबत कुणाला काही सांगितले तर जीवठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा ३० सप्टेंबर रोजी त्याने तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करत असतांना तिने आरडाओरड केली. त्यावेळी पिडीत मुलीच्या आईला जाग आल्यामुळे तो तेथून पसार झाला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीला सोबत घेवून तिच्या आईने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
त्यानुसान मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी अजय काशीराम सोळंखी रा. झिरण्या जि.खरगोन मध्यप्रदेश याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.