ज्येष्ठ संघ स्वयंसेवक बापूराव मांडे यांचे निधन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रभाकर उर्फ बापूराव मांडे यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले.

भुसावळसह परिसरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीमत्व म्हणून परिचीत असणारे प्रभाकर उर्फ बापूराव मांडे ( वय 83 ) यांनी आज पहाटे शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या माध्यमातून एक मान्यवर व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले होते. तसेच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. ते महेंद्र उर्फ सोनू मांडे यांचे पिताश्री होते.

बापूराव मांडे यांच्या पार्थिवावर हरीपुरा येथील आश्रमशाळेच्या परिसरात उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content