मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात आता महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेते घेतील. भाजप जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


मी स्वत:ला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. मी स्वत:ला कॉमन मॅन समजून जनतेसाठी काम केले, असे शिंदे म्हणाले. महायुतीने प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्व घटकांसाठी आम्ही काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही पुढे नेली, असे एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. केंद्रातून त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला, असे ते म्हणाले.
एक साधा कार्यकर्ता म्हणून मी करतो. सोन्याच्या चमचा घेऊन आलेल्यांना गरिबांच्या वेदना कशा कळणार. त्यामुळे महायुतीने प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्व घटकांसाठी आम्ही काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे. मी नाराज नाही, तसेच नाराज होऊन रडणाऱ्यांमधला मी नाही. मी नरेंद्र मोदींना माझ्या भावना कळवल्या आहेत. तुम्ही तुमचा निर्णय घ्या, माझ्यामुळे अडचण होईल हे मनात आणू नका, असे मी मोदींशी फोनवर बोलून सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.


