जळगाव (प्रतीनिधी) आज सोमवार १५ मार्च रोजी रावेर लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपांई(आ) रासपा, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी जळगाव येथील शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी आज फैजपुर येथील खंडेबाबा मंदिर परिसर ( फैजपुर गावठाणभाग )तसेच परिसर या ठिकाणी भेट देऊन रक्षाताई खडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आहवान केले.
यात जळगावचे माजी महापौर तथा नगरसेवक विष्णु भंगाळे, शिवसेना जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, जळगाव महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, सेना नगरसेवक प्रशांत नाईक यांचा समवेश आहे. याप्रसंगी फैजपुर येथील प्रा. सुनिल नेवे, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगर अध्यक्ष फैजपुर नगर परिषद तथा नगरसेवक बापुसाहेब वाघुळदे, निलेश राणे, पी. के चौधरी , संजय रल, शहर अध्यक्ष , महानंद रविद्र होले, नगरअध्यक्ष ,राजु हिरामण कोठवदे, शिवसेना उपशहर प्रमुख रंजनी हिरामण, तेली महिला तालुका प्रमुख शिवसेना नगरसेवक नगरसेवक मिलीद वाघुळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, नगरसेवक अनिल चौधरी, नगरसेविका वत्सला कुभांर, संजय हिरामण तेली, कार्यक्रता शिवसेना यांच्यासह फैजपुर येथील समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.