Home Cities जळगाव केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात शोध प्रबंधाबाबत सेमिनार

केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात शोध प्रबंधाबाबत सेमिनार

0
25

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । केसीई सोसायटी जळगावच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट मधील व्यवस्थापन विभागाद्वारे एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी “शोध प्रबंध कसा लिहावा” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले.

यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे आणि प्रा. डॉ. पवित्रा पाटील यांनी मार्गदर्शन दिले. केसीईचे अकॅडमी डायरेक्टर डॉ. संजय दहाड यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख प्रा. हर्षा देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन एमबीए विद्यार्थिनी हेमांगी फेगडे आणि आभार प्रदर्शन प्रा. हेमंत धनंधरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेत.


Protected Content

Play sound