चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या व्हाट्सअप फेसबुक व मोबाईल गेममुळे लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील यांनी वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी अल्पदरात पुस्तकांची विक्री करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय भास्कर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त येथील नारायण बंकट वाचनालयात वाचकांना तसेच स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महाग मिळणारी पुस्तके अल्पदरात उपलब्ध व्हावे या हेतूने उपलब्ध करून दिली आहेत. या सर्व प्रकारची पुस्तकं फक्त 70 रुपये या अल्पदरात उपलब्ध आहेत. आज पासून पुढील दहा दिवस ही पुस्तके या दरात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज सायंकाळी 5 वाजता या विक्री केंद्राचे उद्घाटन चाळीसगावातील पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात येणार असून या संधीचा लाभ सर्व वाचकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.