मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर, विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या अंतर्गत “आत्मनिर्भर युवती” कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात उचंदा हायस्कूलचे शिक्षक रणजीत पाटील यांनी “संभाषण कौशल्य “या विषयावर युवतींना मार्गदर्शन केले. ते म्हणतात समाजामध्ये राहत असताना दोन व्यक्तींमध्ये संवाद घडून येणे आवश्यक असते.
आज आपल्याला असे दिसत आहे की, विज्ञानाने जग जवळ आले परंतु माणूस माणसापासून दूर जात आहे. याला कारण म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही तंत्रज्ञानाच्या आहारी जात आहे. तर तंत्रज्ञान आणि विज्ञान विकासासाठी जरी आवश्यक असले तरी माणसांमध्ये संवाद घडून येणे अतिशय आवश्यक आहे. मग ते संवाद कौशल्य प्रत्येकीने आपल्यामध्ये कसे विकसित करावे हे पटवून देण्यासाठी त्यांनी इतिहासातील व पुराणातील अनेक उदाहरणे दिली
आजच्या दुसऱ्या सत्रात जे.ई. स्कूल मुक्ताईनगर येथील शिक्षिका रंजना महाजन, यांनी “महिला व व्यक्तिमत्व विकास” या विषयावर बोलत असताना व्यक्तिमत्व म्हणजे काय ? व आपले व्यक्तिमत्व कसे विकसित करावे, यासाठी अनेक टिप्स मुलींना दिल्या. जीवन जगत असताना जन्माला आल्यापासून अनेक आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा प्रभाव हा आपल्या व्यक्तिमत्त्वावर कळत नकळत होत असतो. त्यासाठी आधी आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे.
प्रत्येक वेळी वास्तविकतेचे भान ठेवून उत्साही राहून मानवी मनात निर्माण होणाऱ्या भावनांना काळजीपूर्वक हाताळता आलं पाहिजे तरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा होऊ शकतो. असे त्यांनी सांगितले या कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच.ए. महाजन सर यांनी सुद्धा मुलींना मार्गदर्शन केले व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे तर सूत्रसंचालन व आभार युवती सभेच्या समन्वयिका प्रा. डॉ. प्रतिभा ढाके व युवती सभेच्या सदस्या प्रा.सविता जावळे, प्रा. डॉ. चाटे मॅडम ,प्रा. डॉ. ताहीरा मिर मॅडम यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेला बहुसंख्य विद्यार्थिनींची उपस्थिती होती.