Home पर्यावरण स्व. शास्त्रीभक्ती किशोरदासजी यांच्या स्मरणार्थ वृक्षलागवड

स्व. शास्त्रीभक्ती किशोरदासजी यांच्या स्मरणार्थ वृक्षलागवड


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री कष्टभंजन ग्रुप सुना सावखेडा (फैजपूर), कळमोदा ग्रामस्थ व पिंपरूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने व गुरुवर्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज यांनी केलेल्या आवाहनानुसार सुमारे २१० वृक्षांची लागवड कळमोदा स्मशानभूमी कळमोदा ते न्हावी रस्ता, फैजपूर ते पिंपरुड नव्याने झालेला दोन किलोमीटर रस्ता या ठिकाणी स्व. शास्त्री भक्ती किशोरदासजी यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कळमोदा पिंपरुड ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचसोबत पप्पू चौधरी, बबलू भाऊ महाजन, अमोल बाक्षे, प्रशांत जावळे कळमोदा पोलीस पाटील, भास्कर बोंडे, हितेश बाक्षे, मुकेशमहाराज पाटील,उमेश महाराज मावळे,योगेश बोंडे,किशोर कोळी लोकेश महाजन व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. नुसते वृक्षारोपणच न करता या संपूर्ण वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी ही यावेळी युवकांनी हाती घेतली आहे.


Protected Content

Play sound