मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल, मुक्ताईनगरचा मार्च २०२४ दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या विद्यालयातून शेकडा ९५ गुण मिळवून दिव्यांका दीपक चौधरी प्रथम शेकडा ९४:६० गुण मिळवून वेदिका रामराव तिडके द्वितीय तर तनुश्री गिरीश चौधरी ही शेकडा ९४.४० गुण मिळवून तृतीय आली आहे.
दरम्यान, विद्यालयात जान्हवी शशिकांत गलवाडे शेकडा ९३.६०, श्रृजल सुधीर चौधरी शेकडा ९०.६०, सर्वज्ञ सुनील महाजन शेकडा ९०.६० गुण मिळवत विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले. इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगले गुण प्राप्त केले. याबद्दल संस्थेच्या सेक्रेटरी खा. श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
गुणवंत व किर्तीवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तथा शाळेचे प्राचार्य व्ही. के. वडस्कर तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षिक-तुषार पाटील, उपशिक्षक – स्वप्निल चौधरी, सौ. राजश्री फेगडे, सौ.ज्योती पालवे, सौ.शीतल ठाकूर,सरदार तायडे, गणेश कोळी, महेंद्र बोदडे, गणेश बोदडे, रोशन मालगे, अमोल सुतार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.