जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५१६ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांसह स्नेहाच्या शिदोरी या उपक्रमांतर्गत सुमारे ७०० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला.
कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३३१, फूड पार्क डिव्हाईन पार्क १४३, अलवर ०४ चित्तूर १६, बडोदा ०८, हैदराबाद १२ आणि कांताई नेत्रालय येथे ०२ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क, कांताई मंगल कार्यालय येथे आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले.
प्लास्टिक पार्क, टाकरखेडा टिश्युकल्चर प्लान्ट फॅक्टरी व जैन फूडमॉल या सहकाऱ्यांसाठी प्लास्टिक पार्कच्या डेमोहॉल, (ज्ञानलय), ऍग्रीपार्क, फूडपार्क, एनर्जीपार्क व डिव्हाईनपार्कच्या सहकाऱ्यांसाठी फूड पार्क येथील प्रशासकीय इमारतीच्या दवाखान्याच्या वरच्या हॉलमध्ये आणि कांताई नेत्रालय / जैन स्पोर्ट्स अकॅडमी / जैनशॉप / गोडाऊन येथील सहकाऱ्यांसाठी कांताई नेत्रालयात रक्तदानाची सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान व्यवस्था करण्यात आलेली होती. जळगाव सिव्हील हॉस्पीटल आणि इंडीयन रेडक्रॉस सोसायटी या संस्थांनी रक्त संकलन केले. जैन इरिगेशनचे सहकारी मदन लाठी यांनी या शिबिरात ८५ व्या वेळा रक्तदान केले. नजिकच्या काळात १०० वेळा रक्तदान करण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण होणार आहे.
सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपल्या कंपनीचे नाव जेव्हा जेव्हा समोर येते, तेव्हा तेव्हा लौकीकार्थाने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद ठळकपणे घेतली जाते. कंपनीचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या पासून सुरु झालेल्या सामाजिक कार्याला आजही तितक्याच जोमाने प्रवाहित ठेवले. त्यासाठी संपूर्ण जैन कुटुंबीय नेहमीच प्रयत्नशील असतात. रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हे त्याचेच एक प्रतीक होय.
७०० जणांनी घेतला मिष्टान्नाचा लाभ
बालसुधार गृह, जय जलाराम गायत्री मंदीर, बाबा हरदासराम, शिवकॉलनीतील बालकश्रम, सिंधीकॉलनीतील अंध शाळा, सावखेडा येथील मातोश्री वृद्धाश्रम त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे दीपस्तंभ फाउंडेशनचे विद्यार्थी यांना मिष्टान्न भोजन दिले गेले. त्यात चवळीची उसळ, पनीर मसाला, मसाले भात, पुरी, कचोरी आणि मुगडाळीचा शिरा असा मेनु होता. स्नेहाच्या शिदोरीत पाकीटा ऐवजी भोजन वाढून दिले गेले होते.