अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते. एनसीसी कॅम्पसाठी दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आले आहे.
नववीत शिकणारा कृष्णा विलास जाधव याची केरळ येथे एनसीसी ट्रेकिंग कॅम्पसाठी निवड झाली. सदर कॅम्प २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ या कालावधीत केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कुलथुपुझा येथे आयोजित केलेला आहे. तर दुसरा विद्यार्थी आयुष दीपक सोनवणे याची EBSB (एक भारत श्रेष्ठ भारत) या कॅमसाठी कामठी येथे निवड झालेली आहे. सदर कॅम्प हा २४ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत नागपूरमधील ओटीए कामठी येथे आयोजित केलेला आहे.
सदर विद्यार्थ्यांना ४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे, ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पिनाकी बनिक, एनसीसी ऑफिसचे लिपिक सुनील सोनार व आमच्या साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर समाधान पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सदर निवडीबाबत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सर्व संचालक मंडळ व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कृष्णा व आयुष चे कौतुक व अभिनंदन केले.