भुसावळ प्रतिनिधी । येथील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक प्रदीप साखरे यांची पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळावर राज्य संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे.
शहरातील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक ,तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रदीप रविंद्र साखरे यांची महाराष्ट्र राज्य निसर्ग सामाजिक व पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश राज्य प्रमुख संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे राज्याचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी प्रदीप साखरे यांची नियुक्ती केली आहे. याबद्दल त्यांना त्यांना नुकतीच नियुक्ती पत्र मिळाले आहे त्यांना त्यांच्या भावी पुढील वाटचालीसाठी सुद्धा मोरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
प्रदिप साखरे यांच्या पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण कार्याची दखल घेत तसेच त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल,व राज्य, राष्ट्रीय पातळीवरील संघटन कार्याच्या कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. साखरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.