Home Cities भुसावळ वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षपदी नारायण झटके

वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षपदी नारायण झटके

0
37

भुसावळ प्रतिनिधी– तालुक्यातील दीपनगर येथील वीज निमिती केंद्रात वंचित बहुजन कंत्राटदार शाखेच्या अध्यक्षपदी कंत्राटदार नारायण झटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीशी संलग्न असणार्‍या वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठाण यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यासोबत उपाध्यक्षपदी सुरेंद्र सिंह ठाकुर, हरपाल सिंग संसोयी, सचिव संजय भिरूड सहसचिव दिनकर सूर्यवंशी शकील खान शब्बीर खान, कोषाध्यक्ष जगदीश तराळ संघटक सुरेश टांक सदस्य गोकुल पाटिल, संजय रावलकर, रविंद्र सरदार, नितिन हिवाळे व विजय भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे शाल व श्रीफळ देवून प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष मुबारक खान पठाण प्रदेश उपाध्यक्ष मन्साराम कोळी, सचिव प्रकाश सरदार, सहसचिव उस्मान खान पठान, कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक प्रकाश तायडे, केंद्रीय सदस्य तौसिफ खान पठाण आदींनी सत्कार केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound