आर्यलँडच्या डबलीन येथे उच्च शिक्षणासाठी कोसगावकर नंदिनी पाटलांची निवड

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोसगाव येथील मूळचे रहिवासी विजय भावलाल पाटील (हल्ली मुक्काम पुणे) यांची मुलगी नंदिनी विजय पाटील आयर्लंड येथील मास्टर इन बायोलॉजिकल अँड बायो मोलोकोलर सायन्स इन युनिव्हर्सिटी कॉलेज डबलीन आयर्लंड येथे एम एस बायोटेक्नॉलॉजी शिक्षणासाठी निवड झाल्यामुळे कोसगाव येथील पाटील वाडा व तिचे सर्व नातेवाईक यांनी नंदिनी चे कौतुक केले आहे. त्या सेवानिवृत्त रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उर्फ भाऊलाल वासुदेव पाटील कोसगावकर यांची नात आहे.

नंदिनी या पुणे येथे याआधी बीएससी ब्लेंडेड साठी तिने उच्च शिक्षण घेतले. तिला तिचे वर्ग शिक्षक आणिआई-वडील तसेच तीचे काका डॉ. कैलास पाटील एमडी आयुर्वेद भुसावळ रा. कोसगाव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या भावी शैक्षणिक वाटचाली साठी गुजर समाजातून संपूर्ण कौतुक होत आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केन्द्रीय मंत्री युवा क्रीडामंत्री रक्षाताई खडसे, गुजर समाजाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पाटील-खर्डीकर, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती हिरालाल चौधरी, कमलाकर पाटील मनवेल, पत्रकार अरुण पाटील यांच्यासह आदींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर नंदिनी ही मनवेल विकास सोसायटीची माजी चेअरमन कमलाकर हिरामण पाटील यांची नात (मुलीची मुलगी) आहे

Protected Content